शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल का करू नये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:43 IST

कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे राज्य सरकार नुसत्याच घोषणा करत असून २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेस सरकारच कर्जमाफी ...

कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे राज्य सरकार नुसत्याच घोषणा करत असून २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेस सरकारच कर्जमाफी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात या सरकारकडून सहकार मोडून काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.पाचगाव (ता. करवीर) येथील समृद्धीनगरच्या मैदानावर कॉँग्रेसच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते. प्रमुख उपस्थिती प्रतिमा सतेज पाटील, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार आदींची होती.हर्षवर्धन पाटील म्हणाले, कॉँग्रेस सरकारच्या काळात मी संसदीय कामकाज मंत्री असताना सध्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी आत्महत्येस जबाबदार धरून सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आता गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांना प्रश्न आहे की तुमच्या सरकारवर खुनाचा गुन्हा का दाखल करू नये?कर्नाटक, पंजाब ही कॉँग्रेस शासित राज्ये शेतकºयांना कर्जमाफी देत असतील, तर महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी द्यायला काय हरकत आहे? हे सरकार नुसत्याच घोषणा करीत आहे. त्यामुळे २०१९ला कॉँग्रेस सत्तेवर आल्यावरच शेतकºयांना कर्जमाफी मिळेल.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कॉँग्रेसच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या वातावरण बदलत असून, २०१९च्या निवडणुकीत विधानसभेवर कॉँग्रेसचा तिरंगा फडकविल्याशिवाय राहणार नाही.सतेज पाटील यांनी नोटाबंदी, जीएसटीनंतर कोल्हापुरात प्राधिकरणाच्या माध्यमातून पाण्याची दरवाढ करण्याचे पाप भाजपने केले आहे, असा घणाघात करत हे सरकार सहकार मोडून काढण्यासह विविध पेन्शन योजना बंद केल्याचा आरोपही केला. ‘अच्छे दिन’ फक्त मोदींनाच असून जनता अजूनही त्याच्या प्रतीक्षेत असल्याचा टोला लगावला. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीमधील मिळालेल्या घवघवीत यशानंतर पुढील लक्ष्य विधानसभा ठेवून कामाला लागावे, असे आवाहनही केले.यावेळी ऋतुराज पाटील, हणबरवाडीच्या सदस्य सुप्रिया वाडकर, टोप संभापूरचे सरपंच प्रकाश जिरंगे, दºयाचे वडगावे सदस्य अनिल मुळीक यांनी आपल्या मनोगतातून कोल्हापूर दक्षिणमध्ये कॉँग्रेसचा आमदार होऊन सतेज पाटील कॅबिनेट मंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. संयोजक व पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले.स्वत:चा किल्ला शाबूत नसणाºयांनीआम्हाला शिकवू नये : ऋतुराज पाटीलज्यांना आपला स्वत:चा किल्ला शाबूत ठेवता आला नाही, त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये, असा टोला ऋतुराज पाटील यांनी आजी-माजी आमदार महाडिक यांचे नाव न घेता लगावला. तसेच सतेज पाटील यांची या निवडणुकीच्या निमित्ताने क्रिकेट मॅचप्रमाणे पहिली ओव्हर सुरू झाली असून, सर्वांच्या ताकदीवर २०१९ची निवडणूक जिंकणारच, असेही ते म्हणाले.भोगम-रामाणेंकडून चांदीची तलवार भेटउद्योगपती रामचंद्र भोगम व माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या कुटुंबीयांकडून आमदार सतेज पाटील यांना या कार्यक्रमात चांदीची तलवार भेट देण्यात आली. यावेळी कळंबा सरपंच सागर भोगम, माजी महापौर अश्विनी रामाणे, आदी उपस्थित होते.कळंब्याचे दोन अपक्ष सदस्य कॉँग्रेसमध्येया कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कळंब्यातील विजय खानविलकर व राजेंद्र गुरव या अपक्ष निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या समर्थकांसह कॉँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.हे सरकार आंधळे आणि बहिरेसध्याचे सरकार हे आंधळे आणि बहिरे असल्याचा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भातील कीर्तनकार हंडे महाराज यांच्या कीर्तनातील संदर्भाचा दाखला दिला.

टॅग्स :Politicsराजकारण